“ओबीसींच्या काही नेत्यांनी गोरगरीबांना आरक्षण मिळू नये असं वाटतं आहे. त्यामुळे ओबीसीचे जुनाट नेते तसा प्रयत्न करत आहेत” असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. यावरून राजकारण तापलेलं असतानाच जरांगे यांनी भुजबळांविरोधात टीका करायला सुरवात केलीये. “भुजबळ जातीवाचक बोलत आहेत त्यांना सरकारने रोखलं पाहिजे. मराठा आणि दलित बांधव कधीच समोरासमोर येणार नाहीत” यावेळी सरकार भुजबळांच्या दडपणाखाली आलंय का? असा सवाल विचारत त्यांनी मराठा समाजाने शांत राहावं असं आवाहनही केलंय.