राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे नेहमीच त्यांच्या विधानांमुळं चर्चेत असतात. आज (२७ नोव्हेंबर) तानाजी सावंत हे पुण्यातील एस. एम. जोशी हॉल येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या विविध प्रश्नांना सावंत यांनी उत्तर दिले. त्यावेळी एका पत्रकाराने विचारले की, “मागील काही महिन्यापूर्वी तुम्ही एक विधान केले होते की, २०२४ पर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही; तर मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देईल, असे विधान आपण केले होते. अद्याप ही मराठा आरक्षणा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे तुम्ही राजीनामा देणार का?” असा प्रश्न तानाजी सावंत यांना विचारल्यावर नेमकं काय घडलं? पाहा…