मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ आणि ओबीसी समजाबद्दल वक्तव्य केले होते, त्यावरून वादंग सुरू झाला होता. यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणालेत की, “राजकीय फायदासाठी काही लोक ‘त्या’ शब्दाचा वापर करत आहे. तेवढ्या शब्दामुळे महापुरुषांच्या जातीवर जायला लागले आहेत. जाती-धर्मात तेढ निर्माण होणार असेल तर मी माझं विधान मागे घेतो. विधान मागे घेतलं म्हणजे तो विषय संपला”