महात्मा फुले यांच्या १३३व्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यातील गंज पेठेतील ‘समता भूमी’ येथील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, माजी सनदी अधिकारी महेश झगडे उपस्थित होते.