महात्मा फुले यांच्या १३३व्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यातील गंज पेठेतील ‘समता भूमी’ येथील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर भाषण करत असताना भुजबळांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांनी ओबीसी समाजावर केलेल्या विधानावरून टोला लगावला. “राज्यात नवीन वर्ण व्यवस्था येऊ पाहते आहे. आधीची वर्ण व्यवस्था वेगळी आताची वर्ण व्यवस्था वेगळी. आताची वर्ण व्यवस्था लायकी काढत आहेत” असं भुजबळ म्हणाले.