आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने पुण्यावर लक्ष्य केंद्रित केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज (२८ नोव्हेंबर) पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अशी टीकाही त्यांनी राज्यसरकारवर केली. “आपलं सरकार मराठीबद्दल फक्त तोंड वाजवायला आहे. नुसतं बाळासाहेबांचे विचारावर आम्ही चाललोय असं म्हणायचं, पण कुठले बाळासाहेबांचे विचार घेतले?” असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय.