मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जाहीर सभेत अपशब्द वापरल्याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी महापौर दत्ता दळवी यांना भांडुप पोलिसांनी आज (२९ नोव्हेंबर) अटक केली आहे. यानंतर खासदार संजय राऊत यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. दरम्यान, प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी दळवीच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे.