गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना नेते दत्ता दळवी यांच्या अटकेच्या प्रकरणाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते दत्ता दळवींना मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावरून भाजपा नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीये. “ठाकरे गटात आक्रमक व्हायला राहिलंय तरी कोण?” असा खोचक टोमणाही त्यांनी मारलाय.