पाच राज्यांच्या निवडणुकांसाठीचं मतदान पार पडलं असून आता संपूर्ण देशाला या निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मध्य प्रदेशमध्ये २३० जागांसाठी मतदान झालं आहे. सरकार स्थापनेसाठी ११६ आमदारसंख्या हवी आहे. यामध्ये कोण बाजी मारणार हे काही दिवसांत कळेलच. तत्पूर्वी मतदान पार पडल्यानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विजयाचा आत्मविश्वास दर्शवला आहे.