मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपल्यानंतर इंग्रजी पाट्यांविरोधात राज्यभरात मनसैनिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्याचदरम्यान आज (१ डिसेंबर) मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्त्वाखाली जंगली महाराज रोडवरील हॉटेल व दुकानांवरील इंग्रजी नावाच्या पाट्यांविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी दुकानावर दगडफेक करीत इंग्रजी फलक फोडण्यात आले. यानंतर घोषणाबाजीमुळे वातावरण तापल्याने आंदोलक मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं