तेलंगणा विधानसभेसाठी काल ( ३० नोव्हेंबर ) मतदान पार पडलं. त्याठिकाणी भारत राष्ट्र समिती ( बीआरएस ) आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तेलंगणात तळ ठोकला होता. अशातच तेलंगणात प्रचारसभेवेळी एक अनुवादक भाषणाचं भाषांतर करताना कसा अडचणीत सापडला होता, याचा किस्सा त्यांनी सांगितलाय.