शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांची जामीनावर सुटका झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल भाषणात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी त्यांना तीन दिवसांपूर्वी अटक झाली होती. आज त्यांची जामीनावर मुक्तता झाल्यावर त्यांच्या कुटुंबाने त्यांचे आरती ओवाळून स्वागत केले आहे. यावेळी दळवी यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.