मोठा भाऊ उपसरपंच होताच धाकट्या भावाने चक्क हेलिकॉप्टरने गावाला प्रदक्षिणा घातली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी साहेबराव खिलारे हे उपसरपंच म्हणून निवडून आले. हा आनंद लहान भावाने गावातील श्रीराम मंदिराच्या कळसाला हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घालून साजरा केला आहे.