मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व असेलेले मनोज जरांगे पाटील हे धुळे दौऱ्यावर आले असता त्यांनी सभेमध्ये राज्य सरकारसह मंत्रिमंडळातील मंत्री गिरीश महाजन यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. “तुमच्याकडे मोठमोठे नेते आहेत. आंदोलनामध्ये होतो तेव्हा ते आमच्याकडे येत होते, मग इथं त्यांचे हात मोडले आहेत का? त्यांना इकडे पाण्यासाठी तळे बनवता येत नाही का?” असा सवाल करत मंत्री गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता जरांगे पाटील यांनी निशाणा साधलाय.