तामिळनाडू भागात बंगालच्या खाडीत मिचौंग चक्रिवादळ तयार होत आहे. त्याचा थोडाफार परिणाम हा विदर्भात जाणवेल. त्यामुळे विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाचे वैज्ञानिक मोहनलाल साहू यांनी वर्तवली आहे. यात कोस्टल परिसरात १०० किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारा असणार असल्याने विदर्भात वाराधून असेल.