शरद पवार गटाला टक्कर देण्यासाठी अजित पवार गट सुनेत्रा पवारांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सुनेत्रा पवार यांचे बारामतीच्या भावी खासदार असा उल्लेख असलेले बॅनरही मंत्रालयाबाहेर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी लावले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.