‘राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला ४० आणि म्हशीच्या दुधाला ८० रुपये दर मिळाला पाहिजे’ या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी पुण्यातील लाल महाल ते कुमठेकर रोडवरील दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयावर कावड मोर्चा काढला. या मोर्चात दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील केली गेली.