महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात देशातली मुलींची पहिली शाळा सुरू केलेला भिडेवाडा रात्री पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आला. आता त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक होणार आहे. त्याआधी ४ डिसेंबरला दुपारी पुणे महानगर आयुक्त अधिकारी भिडेवाड्याची जागा ताब्यात घेण्यासाठी गेले असता तेथील दुकानदार आणि व्यापारी त्याचा विरोध करताना दिसले. “आमच्यावर हा अन्याय असून आम्हाला स्मारकाला विरोध करायचा नाही. पण आम्हाला यावर पर्यायी जागा द्या” असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.