शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने आज बीडमधल्या परळीत शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मुंडे भाऊ-बहिणीतील राजकीय दरीमुळे हा कार्यक्रम आधीच चर्चेत आला होता. पंकजा मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का? इथपासून कार्यक्रमातील राजकीय टोलेबाजीपर्यंत अनेक गोष्टींवर चर्चा पाहायला मिळाली. अखेर हा कार्यक्रम आज परळीमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रमाणेच पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे दोघेही एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले.