पुण्यातील ललित पाटील प्रकरण काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांनी लावून धरलं आहे. अधिवेशनात देखील हे पडसाद पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार रविंद्र धंगेकर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी डॉक्टरी वेशभूषेत विधानभवनात दाखल झाले. यावेळी परिसरातील सर्वांचंच लक्ष त्यांनी वेधून घेतलं.