जामिनावर बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी आज पहिल्यांदा हिवाळी अधिवेशनाला उपस्थिती लावली. सर्वात शेवटी ते सत्ताधारी बाकावर बसले. त्यामुळे नवाब मलिकही अजित पवार गटत असल्याची आता चर्चा आहे. दरम्यान, मलिक यांच्या आर्थिक गैरव्यवहारावरून भाजपा आणि आताच्या सत्ताधाऱ्यांनी रान उठवलं होतं. मात्र आज नवाब मलिकांबाबत सरकारची भूमिका काय आहे याबाबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी प्रश्न केला असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.