सर्वोच्च न्यायालयात कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं. या याचिकांवर सुनावणी पार पडल्यानंतर आज (११ डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. कलम ३७० रद्द करणारा निकाल न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं म्हटलं आहे.