पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी केल्याप्रकरणी खासदार संजय राऊतांवर गुन्हा दाखल झाला आहे. यवतमाळच्या उमरखेडमधील भाजपा नेत्याने याविरोधात तक्रार दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांनी आज माध्यमांशी नागपूरमध्ये संवाद साधला. गृहमंत्री अमित शाहांनी देखील माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंवर टीका केली होती. मग त्यांच्यावरही गुन्हा दाखल करणार का? असा उलट प्रश्न त्यांनी केला.