मुंबईत बुधवारी, ७ डिसेंबर रोजी पार पडलेल्या ‘लोकसत्ता शहरभान’च्या कार्यक्रमाला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी एमएमआरडीए अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. तसंच शिवडी येथून सुरू होणारा मुंबई-पारबंदर प्रकल्प (शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) नवी मुंबईच्या दिशेला जिथे संपतो तेथे एक नवीन नगर विकसित करण्यात येणार असल्याची घोषणाही मुखर्जी यांनी यावेळी केली.