गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच धगधगत आहे. बीडमध्ये आक्रमक मराठा आंदोलकांनी अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक करत गाड्यांची जाळपोळही केली होती. त्यावरून प्रकरण चांगलंच तापलं. हा मुद्दा प्रकाश सोळंकेंनी काल (१२ डिसेंबर) विधानसभेत उपस्थित करत मुख्यमंत्री गृहमंत्र्यांकडे एक मागणी केली आहे.