मराठा आरक्षणाच मुद्दा राज्यात चांगलाच तापला आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधी भूमिका घेतली आहे. त्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ एकमेकांविरोधात टीकास्त्र डागत आहेत. याच मुद्द्यावरून काल (१२ डिसेंबर) सभागृहात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण छगन भुजबळांवर निशाणा साधला. त्यावर भुजबळ यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं.