गेल्या काही दिवसांपासून मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात तू-तू, मैं-मैं सुरू आहे. आता जरांगे-पाटलांनी भुजबळांवरून भाजपाला थेट इशारा दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय करू नका”;असं जरांगे-पाटलांनी म्हटलं आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.