परवा (१३ डिसेंबर) राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच तापला होता. यावेळी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत म्हणाले, “सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. परंतु केवळ २०० विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाईल, असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. ही संख्या वाढवण्यात यावी. सतेज पाटील यांची मागणी ऐकताच उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत? अजित पवारांच्या या धक्कादायक वक्तव्याचं सतेज पाटलांसह अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. यावर आता स्वतः अजित पवारांनीच प्रतिक्रिया दिली आहे.