काल (१३ डिसेंबर) लोकसभेत झालेल्या घुसखोरी प्रकरणाचे तीव्र पडसाद राष्ट्रीय स्तरावर उमटताना दिसत आहेत. यासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपली भूमिका मांडली. “काल जो प्रकार घडला, सगळ्यांनीच त्या घटनेचा निषेध केला. ही फार दुर्दैवी घटना आहे यात कोणतंही दुमत नाही. आपण ज्या कुणाला प्रवेशासाठी पास देत आहोत, त्यात अशा कुठल्या व्यक्तीला पास दिला जाऊ नये जो अशा प्रकारचा कुठला प्रकार संसदेत करेल. आपण सगळ्यांनीच ही काळजी घेणं गरजेचं आहे”, असं आवाहन राजनाथ सिंह यांनी केलं