मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून हिवाळी अधिवेशनात खडाजंगी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. त्यावरून भुजबळांनी गुरुवारी (१४ डिसेंबर) सभागृहात हा विषय मांडत मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केला आहे. आपल्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू असल्याचं भुजबळ यावेळी म्हणाले.