आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपावरून काय चर्चा झाली याबाबतचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी जागावाटपात काही वाद होणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला आहे. विधानभवनाबाहेर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.