मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात संघर्ष चालू आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मराठा आंदोलनादरम्यान, बीडमध्ये जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले होते. यानंतर आता “राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे भुजबळांना साथ देत आहे” असा आरोप जरांगेंनी केला.