धारावी पूनर्विकास प्रकल्प अदानी समूहाकडे गेल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे. त्यांनी याविरोधात आज मोर्चाचे आयोजन केले असून धारावीतून हा मोर्चा थेट अदानींचे मुख्यालय असलेल्या बीकेसीतील कार्यालयाजवळ जाणार आहे. याप्रकरणी आज संजय राऊतांनीही मोठा आरोप केला. धारावी पूनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा असल्याचं संजय राऊत म्हणाले. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.