गेल्या काही महिन्यांपासून मराठासह धनगर आरक्षणाचा मुद्दादेखील चर्चेत आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा आक्रमकपणे लावून धरला आहे. काल (१५ डिसेंबर) विधानपरिषदेत पडळकरांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा मांडला. धनगर आणि मराठा समाजासाठी वेगळा न्याय करता येणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.