मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद काही संपताना दिसत नाही. आज झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगेंनी भुजबळांवर पुन्हा टीकास्त्र डागलं आहे. भारतात शासकीय नोंदी फक्त मराठ्यांच्या सापडल्या आहेत. खरे ओबीसी आरक्षणात आम्ही आहोत, तुम्ही अतिक्रमण केलं, असंही जरांगे यावेळी म्हणाले.