धारावी पुनर्विकास प्रकल्प अदाणी समूहाकडे गेल्याने त्याविरोधात ठाकरे गटाने आज (१६डिसेंबर) धारावी ते बीकेसी असा मोर्चा काढला. या मोर्चात खुद्द ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी धारावीच्या विकासावरून अदाणी भाजपासह शिंदे गटावरही टीकास्त्र डागलं