मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यामध्ये मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील रूग्णालयात जरांगेंची भेट घेतली. यावेळी महाजन आणि भुमरे यांनी जरांगेंशी चर्चा केली माध्यमांशी संवाद साधला. यावेळी “आम्हाला १०० टक्के मिळणारं आरक्षण द्यायचंय, टिकणाऱ्या मार्गाने आरक्षण देऊ, असं महाजन म्हणाले, तर “अंतरावालीतील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण, तीन महिने झालं, अद्यापही घेण्यात आले नाहीत” अशी संतप्त प्रतिक्रिया जरांगेंनी दिली.