प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिन ड्राईव्ह) हाती घेतली आहे. ३ डिसेंबरला या मोहिमेचा धारावीमधून शुभारंभ झाल्यानंतर आज (१७ डिसेंबर) मुंबईच्या कामराज नगर, घाटकोपर या भागांत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.