नागपूरजवळील बाजारगाव येथे असलेल्या सोलर एक्सप्लॉसिव्ह कंपनीत स्फोट झाला. या स्फोटात ९ जण ठार, तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर दारुगोळा तसेच रसायने असल्यामुळे यात मोठी जीवितहानी झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या स्फोटाची तीव्रता नेमकी किती होती याची अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाही. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले असून आतमध्ये पोहोचून स्थिती स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी दिली.