जगातील सर्वांत मोठं कार्यलय असलेल्या सूरत डायमंड बोर्सचे आज (१७ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. गेल्या काही वर्षांत सूरत हे नवे व्यापारी पेठ म्हणून उदयाला येत आहे. त्यामुळे येथे आता सराफा बाजार केंद्र निर्माण करण्याच्या उद्देशाने सूरत डायमंड बोर्स तयार करण्यात आलं आहे. यामुळे देशाला जागतिक स्तरावर हिरे व्यापार करण्यास संधी मिळेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमलेल्या जनतेशी संवाद साधला.