नागपूर-अमरावती मार्गावरील गोंडखैरीच्या बस स्थानकाजवळ एका ट्रक आणि बाईकची धडक होऊन भीषण अपघात झाला. ट्रक आणि बाईकची धडक होऊन बाईकचालक ट्रकच्या बोनेटमध्ये अडकले होता. तेवढ्यात मागून ट्रकला एका वेगवान कारनेही धडक दिली. या तिहेरी अपघातात काहीजण जखमी झाले. याच मार्गावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जात होता. त्यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी ताफा थांबवून जखमींना मदत केली.