भिवंडी येथील सोनाळे ग्रामपंचायत क्रीडांगणावर रविवारी ठाणे जिल्हा ओबीसी महासंघातर्फे ओबीसी निर्धार महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर देत जरांगे यांच्यावर टीका केली. “महात्मा गांधी यांनी उपोषण केल्यावर त्यांना व्हॉईसरॉय भेटायला जायचे, त्याप्रमाणे आमचे लोक मनोज जरांगे यांना भेटायला जातात, त्याच्या पाया पडतात, विनंती करतात आणि त्याला डोक्यावर चढवतात”