पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी (१७ डिसेंबर) दौऱ्याच्या पहिल्या दिवशी वाराणसीहून कन्याकुमारीकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसलाही हिरवा झेंडा दाखवला. यानंतर पंतप्रधान मोदींनी नाडेसर भागातील कटिंग मेमोरियल शाळेच्या मैदानात विकास भारत यात्रेअंतर्गत उभारलेल्या स्टॉलला भेट दिली. तिथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी काही दिव्यांगांशी संवादही साधला. मोदींनी दिव्यांगांशी साधलेल्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.