राज्य विधिमंडळ अधिवेशाचा आजचा (१८ डिसेंबर) आठवा दिवस आहे. आजपासून शेवटच्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान विधानभवनात आमदार रोहित पवारांनी विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. “विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या संत्रा निर्यातीसंदर्भात सरकारने उशिरा घेतलेल्या निर्णयामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आता संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत प्रती हेक्टरी अनुदान देण्यासाठी सरकार ६०० ते ७०० कोटी रुपये मदत करणार का?” असा सवाल त्यांनी विचारला.