ठाकरे गटाच्या महानगर प्रमुखाने दाऊदशी संबंधित माणसाबरोबर एका पार्टीत उपस्थिती लावल्याचा विषय सध्या चांगलाच तापला आहे. त्यावर मविआ नेत्यांनीदेखील त्या पार्टीत सत्ताधारी पक्षातील नेते देखील उपस्थित असल्याचे फोटो दाखवले. सभागृहात एकनाथ खडसेंनी हा विषय काढताच ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनीही तो लावून धरला.