तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी सभापती तथा उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांची नक्कल करत असताना राहुल गांधी त्यांचा व्हिडीओ काढत होते. त्यावरून राहुल गांधींनी उपराष्ट्रपतींचा अपमान केल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. याविषयी राहुल गांधींनी पत्रकारांना प्रश्न विचारला असता त्यांनी पत्रकारांनाच सुनावलं आहे.