Maharashtra Vidhan Sabha LIVE: राज्य विधिमंडळ अधिवेशाचा आजचा दहावा आणि शेवटचा दिवस आहे. गेल्या तीन आठवड्यात कांदा निर्यात प्रश्न, इथेनॉल प्रश्न, अवकाळी पाऊस, मराठा आरक्षण, दिशा सालियान प्रकरण आदी मुद्द्यांवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. दरम्यान, अधिवेशन आणखी काही दिवस वाढवावं अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली होती. मात्र अधिवेशन आजच गुंडाळलं जाणार आहे. त्यामुळे विरोधक आता काय पवित्रा घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Today is the tenth and last day of the state legislative session. In the last three weeks, the opposition and the ruling parties have seen a fight over issues like onion export issue, ethanol issue, unseasonal rains, Maratha reservation, Disha Salian case etc. Meanwhile, the opposition parties demanded that the session be extended for a few more days. But the session will be wrapped up today. So it will be important to see what stance the opposition will take now.