नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. विधानभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरून चर्चा होत आहे. सभागृहात विदर्भाच्या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. विदर्भात येऊन विरोधी पक्षाला विदर्भाचा विसर पडल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी विदर्भाच्या प्रस्तावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावला. त्यावर अजित पवारांनी त्याचं शब्दांत उत्तर दिलं आहे.