मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणप्रश्नी २४ डिसेंबरची अंतिम मुदत दिली आहे. त्यावर ते ठाम आहेत. या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी जरांगेंना जाहीर विनंतीदेखील केली.