राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन गेल्या दहा दिवसांपासून सुरू होतं. काल बुधवारी (२१ डिसेंबर) अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. गेल्या दहा दिवसांत सत्ताधारी व विरोधी पक्षाचे आमदार आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. सभागृहात आमदारांनी एकमेकांवर टोलेबाजी, मिश्कील टिप्पणी केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या एका विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे.